नाशिक (प्रतिनिधी) : इगतपुरी त्रंबकेश्वर मतदारसंघाचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांचे वडील भिकाजी गोपाळ खोसकर यांचे काल रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.
शेतीद्वारे आपल्या कुटुंबाची गुजराण करणार्या भिकाजी खोसकर यांच्या पश्चात पत्नी काशाबाई, हिरामण व परशुराम ही दोन मुले, मिराबाई गुंबाडे आणि गीताबाई दोबाडे या दोन मुली असा परिवार आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिक तालुक्यातील नाईकवाडी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.