नाशिक ( प्रतिनिधी) नाशिक जिल्ह्याची अग्रणी बँक नामकोच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज अर्ज माघारीच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, सरचिटणीस संजय सानप व नाशिक मनपाचे माजी नगरसेवक अजिंक्य साने त्याचप्रमाणे माजी आमदार स्वर्गीय हिरामण यांचे चिरंजीव शाम मोहेकर यांनी देखील आज निवडणुकीतून अर्ज मागे घेतला आहे .
यांच्यासह चौदा इच्छुक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. तीन दिवसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या २५ झाली आहे.