नामको बँके निवडणुकीत
नामको बँके निवडणुकीत "इतके" टक्के मतदान
img
Mukund Baviskar

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक मर्चंट्‌स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत १९ जागांसाठी आज मतदान झाले. सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले असून 29.50 टक्के मतदान झाले.

५५७२५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून मागील निवडणुकीपेक्षा ही टक्केवारी वाढली आहे. मागील निवडणुकीत सुमारे ३७ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

उद्या मतमोजणी होणार असून साधारणतः दोन दिवस ही मतमोजणी चालू राहू शकते, मात्र एका दिवसात मतमोजणी पूर्ण करण्याचा निश्चय निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे. एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत.

विशेष म्हणजे जिल्ह्यासह परराज्यांत कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट्‌स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत इच्छुकांनी अर्ज दाखल करीत भाऊगर्दी केल्याने निवडणूक रंगतदार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, माघारीच्या दिवशी विरोधी सहकार पॅनलच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक एकतर्फी झाली. या शिवाय, प्रगती पॅनलच्या महिला राखीव गटातील सपना आनंद बागमार व शीतल सूरज भट्टड यांची बिनविरोध निवड झाली. 
 
तसेच बँकेचे १ लाख ८८ हजार ६३८ मतदार आहेत. मतदानासाठी अडीच हजार कर्मचारी नियुक्त केले होते. निवडणुकीसाठी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात मतदान झाले.

निवडणुकीसाठी ३२४ मतदान केंद्रे होती, नाशिक शहरात १५५ मतदान केंद्रांवर मतदारांनी हक्क बजावला तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४४ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान केले.

आता सर्व केंद्रांवर मतदान झाल्यानंतर सर्व मतपेट्या या नाशिक शहराकडे रवाना होत आहेत. मात्र जालना येथील मतपेट्या येण्यास उशीर होणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याबाहेर मुंबई, पुणे, चाकण, छत्रपती संभाजीनगर, जालना, वैजापूर, जळगाव, धुळे, दोंडाईचा, नंदुरबार, अहमदनगर, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर या २० मतदान केंद्रांवर मतदान झाले. राज्याबाहेर सुरत व हैदराबाद येथे प्रत्येकी एक आणि दोन मतदान केंद्रे कार्यरत होती. मतदान झाल्यावर उद्या सकाळी 8 वाजता श्री छत्रपती संभाजी महाराज स्टेडियममध्ये मतमोजणीस सुरुवात होईल. एकूण १०८ टेबलांवर ही मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणींचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group