मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे अनेकांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. या मालिकांमधील पात्रही प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागतात. प्रेक्षक मालिकांवर भरभरून प्रेम करतात. तितकंच प्रेम ते त्या मालिकांमधील कलाकारांवरही करतात. मात्र मालिका सुरू असण्याला आणि बंद होण्याला जबाबदार असतो तो टीआरपी. मालिकांमध्ये असते ती टीआरपीच्या स्पर्धा. छोट्या पडद्यावरील मालिका या टीआरपीवर अवलंबून असतात. टीआरपी कमी झाला की त्या मालिका बंद करून निर्माते दुसऱ्या विषयांवरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणतात.
मराठी मालिका विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग' या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.
2. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमाकांवर असून या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.
3. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
4. तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
5. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे.
6. टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' ही मालिका सहाव्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.8 रेटिंग मिळाले आहे.
7. 'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे.
6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.9 रेटिंग मिळाले आहे.
7. 'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्यनुसार या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे.
8. टीआरपीच्या शर्यतीत 'आता होऊ दे धिंगाणा 2' हा कार्यक्रम आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.4 रेटिंग मिळाले आहे.
9. 'शुभविवाह' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.8 रेटिंग मिळाले आहे.
10. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.8 रेटिंग मिळाले आहे.
टीआरपीच्या शर्यतीत कथाबाह्य कार्यक्रम पडले मागे
टीआरपीच्या शर्यतीत कथाबाह्य कार्यक्रम मागे पडले आहेत. 'सारेगपम लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला असून या कार्यक्रमाला 1.2 रेटिंग मिळाले आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला 1.3 रेटिंग मिळाले आहे. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाला 0.7 रेटिंग मिळाले आहे. एकंदरीतच मालिका पाहायला प्रेक्षक पसंती दर्शवत असून कथाबाह्य कार्यक्रमाला कमी रेटिंग मिळाले आहे.