इन्स्टाग्राम स्टोरीनं सस्पेन्स वाढला ! आशिया कप संपताच बुमराहचा मोठा निर्णय; म्हणाला 'त्या' अफवा खऱ्या
इन्स्टाग्राम स्टोरीनं सस्पेन्स वाढला ! आशिया कप संपताच बुमराहचा मोठा निर्णय; म्हणाला 'त्या' अफवा खऱ्या
img
दैनिक भ्रमर
२०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरलंय. रोमांचक अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एक मोठा निर्णय घेतला.

आशियाई क्रिकेट परिषद (ACC)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे प्रभावशाली नेते मोहसिन नकवी यांच्या विरोधात टीम इंडियाने स्पष्ट भूमिका घेत फायनल सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने त्यांच्याकडून एशिया कपची विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. ज्यामुळे चांगलेच नाट्य रंगल्याच पहायला मिळालं. 

आशिया कप संपताच बुमराहने दुसऱ्या संघात सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारताने आशिया कप जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले. या स्टोरीमध्ये 'होय! अफवा खऱ्या आहेत. मी तिसऱ्या संघात सामील होत आहे. मी उद्या त्याबाबत घोषणा करेन' बुमराहने असे म्हटले आहे. या स्टोरीमुळे चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत, या प्रश्नांची उत्तरे उद्या बुमराहच देणार आहे.

जसप्रीत बुमराहची इंस्टाग्राम स्टोरी पाहिली आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर जसप्रीत बुमराह तिसऱ्या संघात (ब्लू टीममध्ये) सामील होणार असल्याचे समजते. भारतीय संघाला जर्सीमुळे मेन इन ब्लू असे म्हटले जाते. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबईच्या संघाचा रंग देखील निळाच आहे. या दोन संघाव्यतिरिक्त इतर अनेक संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. आता या सर्व संघांपैकी कोणत्या संघात बुमराह सामील होणार आहे? याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group