भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला. कारण वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. या डावात भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ३ गडी बाद केले. यासह त्याने मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूची बरोबरी केली आहे.

वेस्टइंडिज विरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मोठा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हा रेकॉर्ड कुणालाच जमला नाही आहे,जो आता बूमराहने करून दाखवला आहे. जसप्रीत बुमराहने या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 12 फलंदाजांना क्लिन बोल्ड केले आहे. त्याच्यानंतर मोहम्मद सिराज (9) आणि शमार जोसेफ (9) यांचा क्रमांक लागतो. मिचेल स्टार्क (7), स्कॉट बोलँड (6) आणि जोमेल वॉरिकन (6) यांचाही या यादीत समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, बुमराहने 2025 मध्ये गोलंदाजी करून 15 बळी घेतले आहेत, जे या वर्षी कोणत्याही पूर्ण सदस्यीय गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 147 बळी घेतले आहेत. ज्यामुळे तो या यादीत भारतासाठी चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या आधी अनिल कुंबळे (186), कपिल देव (167) आणि रविचंद्रन अश्विन (151) यांचा क्रमांक लागतो. बुमराहने रवींद्र जडेजा (145) ला मागे टाकत यादीत अव्वल स्थान पटकावले.