मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, पिंजरा फेम संध्या शांताराम यांचं निधन
मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, पिंजरा फेम संध्या शांताराम यांचं निधन
img
वैष्णवी सांगळे
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा पिंजरामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. काल संध्या यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्या यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात आहे. 


शनिवारी सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टूडिमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. 

रोहित शर्माचं वनडेतील कर्णधारपद जाणार, 'या' खेळाडूकडे जाणार संघाची धुरा

व्ही शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून संध्या या आजारी होत्या. काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार झाले’ असे किरण शांताराम यांनी सांगितले.संध्या यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात आपला ठसा उमटवला होता. 

अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली. पिंजरा हा त्यांचा गाजलेला सिनेमा होता. अमर भूपाळी, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, वरंग, जल बिन मछली नृत्य बिन बिजली यासारख्या चित्रपटात अजरामवर भूमिका साकरल्या. संध्या या प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पत्नी होत्या. संध्या शांताराम यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group