नाशिक : कॉलेज रोडच्या पुमा शोरूममध्ये 17 लाखांच्या वस्तूंची चोरी
नाशिक : कॉलेज रोडच्या पुमा शोरूममध्ये 17 लाखांच्या वस्तूंची चोरी
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शटरचे बटण व लॉकपट्टी तोडून अज्ञात चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश करून महागडे शूज, टी शर्ट, ट्रॅक पँट, जॅकेट, इतर अ‍ॅक्सेसरीज व रोकड असा सुमारे 17 लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना पुमा शोरूम येथे घडली.


आभाळाला गवसणी घालू पाहणाऱ्या संस्कृतीसोबत भयंकर घडलं, उंच इमारतीवरुन वीट कोसळली अन...

याबाबत प्रशांत महेश मिश्रा (रा. शिवकृपा, महालक्ष्मीनगर, हिरावाडी, पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की कॉलेज रोड येथे पुमा शोरूम व ओपन मॉल आहे. दि. 5 ते 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने या शोरूमच्या सेंटरचे बटण व लॉकपट्टी तोडून शोरूममध्ये प्रवेश केला. यावेळी अज्ञात चोरट्यांनी शोरूममध्ये असलेले 9 लाख 18 हजार 388 रुपये किमतीचे 256 नग पुमा कंपनीचे शूज, 6 लाख 85 हजार 951 रुपये किमतीचे पुमा कंपनीचे 337 नग टी शर्ट ट्रॅक पँट, जाकीट शॉर्ट पँट, 81 हजार 267 रुपये किमतीचे पुमा कंपनीचे 59 नग बॅग सॉक्स, कॅप, बॉटल, वॉलेट व 91 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 16 लाख 85 हजार 606 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. 



puma |
इतर बातम्या
Join Whatsapp Group