क्रिकेटर पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एका सामन्यादरम्यान पृथ्वी शॉ चांगलाच संतापला आणि तो थेट मुशीर खानला मारण्यासाठी त्याच्या अंगावर बॅट घेऊन धावला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहे. पण या व्हिडिओमागचं खरं कारण समोर आलं आहे.
नेमकं काय घडल ?
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी ( ७ ऑक्टोबर) ही घटना घडली. शॉने यासामन्यात 220 चेंडूंवर 21 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शानदार 181 धावा केल्या. पण ही घटना शॉ बाद झाल्यानंतर लगेच घडली, तेव्हा महाराष्ट्राचा स्कोअर 430/3 होता. 74व्या षटकात मुशीर खानच्या गोलंदाजीवर इरफान उमैरने फाईन लेगवर त्याचा कॅच घेतला.

वाद का झाला? Inside माहिती समोर
यानंतर शॉ पॅव्हेलियनकडे परतताना मुशीरनं त्याला “थॅंक यू” म्हणत स्लेजिंग केली. हा कमेंट ऐकताच शॉ चिडला आणि थेट मुशीरकडे धावत गेला. त्याने त्याचा कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला आणि हातातील बॅट उचलली. मात्र, अंपायर आणि इतर खेळाडूंनी तातडीने मध्यस्थी करत परिस्थिती शांत केली. व्हिडिओ फुटेजमध्ये मैदानावरील पंच शॉला शांत करताना आणि त्याला मुंबईच्या खेळाडूंपासून दूर नेताना दिसतात.
पृथ्वी शॉने 2016-17 हंगामात मुंबईकडून फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2018-19 मध्ये अवघ्या 18व्या वर्षी टेस्ट पदार्पण केले. मात्र, मागील हंगामानंतर त्याने मुंबई संघ सोडून महाराष्ट्रात प्रवेश केला.
महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावने म्हणाला की, “हा एक सराव सामना आहे. सर्व खेळाडू एकमेकांचे जुने चांगले मित्र आहेत. अशा गोष्टी कधी कधी घडतात. आता सर्व काही ठीक आहे आणि काहीही वाद नाही.” आता तरी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MACA) यांनी या प्रकरणात कोणतीही पुढील कारवाई केलेली नव्हती.