ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून तेजस ठाकरे यांनी अनेक दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचा शोध लावला आहे. याद्वारे त्यांनी यांना एक नवी ओळख मिळवून दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आणि त्यांच्या टीमने सापाची नवीन प्रजाती शोधली होती.

पश्चिम घाटात त्यांनी ‘सह्याद्रीओफिस उत्तरघाटी’ या सापाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला होता. संस्कृत ‘सह्याद्री’ आणि ग्रीक ‘ओफिस’ (साप) या शब्दांवरून हे नामकरण करण्यात आले.त्यासोबत तेजस ठाकरे यांनी पालींच्या अनेक नवीन प्रजातींचा शोध लावला आहे.
तेजस ठाकरे आणि त्यांच्या ग्रुपने पुन्हा एकदा पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या खजिन्यात मोलाची भर घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील निमसदाहरित जंगलामध्ये त्यांनी केसाळ गोगलगायींच्या एका नवीन प्रजातीचा यशस्वीरित्या शोध लावला आहे. या महत्त्वपूर्ण शोधामुळे या लहान प्रजातींच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे
गोगलगायीच्या या नवीन प्रजातीचे शास्त्रीय नामकरण प्रसिद्ध जपानी अॅनिमेटर आणि स्टुडिओ घिबलीमधील सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या नावावरून ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ असे करण्यात आले आहे. मियाझाकी यांच्या चित्रपटांत निसर्गाचे महत्त्व सुंदरपणे दर्शविले जाते. त्या तत्त्वज्ञानाला आदरांजली म्हणून हे नामकरण करण्यात आले आहे. त्यांचा हा रिसर्च ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मॅग्झिनमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.