शेतकऱ्यांनो आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा, बच्चू कडू यांचं वादग्रस्त विधान
शेतकऱ्यांनो आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा, बच्चू कडू यांचं वादग्रस्त विधान
img
वैष्णवी सांगळे
प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त करताना एक अत्यंत वादग्रस्त आणि भडकाऊ आवाहन केले आहे. आत्महत्या करण्याऐवजी थेट एखाद्या आमदाराला कापून टाकण्याचा किंवा सार्वजनिक ठिकाणी विवस्त्र होऊन आंदोलन करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.


प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बुलढाणा येथे झालेल्या शेतकरी हक्क परिषदेत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 'शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा', असे वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधान बच्चू कडू यांनी केले. कडू पुढे म्हणाले की, मरण्यापेक्षा एखाद्या आमदाराच्या घरासमोर कपडे काढून बसलेलं परवडेल.

त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी याला प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट म्हटले आहे, तर काहींनी त्यांच्या भूमिकेमागील हेतू योग्य असला तरी वापरलेली भाषा चुकीची असल्याचे म्हटले आहे. या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group