सध्या 'तेरे इश्क में' चित्रपटाची खूप चर्चा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता धनुष आणि क्रिती सेनन सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्यासोबत हे तिघेही नुकतेच पुणे शहरात दाखल झाले आणि त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनसोबतच येथील प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा मनमुराद आस्वाद घेतला.
साउथचा सुपरस्टार धनुष आणि क्रिती सेनन यांची पुण्यातील फॅन्सची भेट घेऊन तेथील खाद्यपदार्थांवर मनमुराद ताव मारला. धनुषने त्याच्या स्टोरीवर दोन व्हिडिओ क्लिप शेअर केल्या आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये, तो आणि दिग्दर्शक आनंद एल. राय गाडीत बसून वडापाव खाताना दिसत आहेत.
क्रिती सेननने दोघांना विचारले, "चांगला आहे का?" यावर धनुष म्हणाला, "उत्कृष्ट, अविश्वसनीय!" तर आनंद एल. राय यांनीही त्याला दुजोरा देत, "चांगला आहे" असे सांगितले. क्रितीने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, "पुण्यात आलात तर खा आणि जेवणाच्या प्रेमात पडा!"