आमदार संतोष बांगरांनी सर्व नियम बसवले धाब्यावर; महिला मतदाराला मतदान...
आमदार संतोष बांगरांनी सर्व नियम बसवले धाब्यावर; महिला मतदाराला मतदान...
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान करतानाचा व्हिडिओ मोबाईल व्दारे शुट केला आहे. बांगर यांनी एव्हीएमचे बटन दाबताना आपण कुठल्या उमेदवाराला मतदान करतोय, याचा व्हिडिओ काढला आहे. हा व्हिडिओ काढताना त्यांचाही समोरुन व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. 

त्यासोबतच मतदान कक्षात जाऊन प्रत्यक्ष बटन दाबताना एका महिला मतदाराला मार्गदर्शन केले. हा सर्व प्रकार सकाळी हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे घडला. मतदान केंद्रात “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणाबाजी केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून त्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.

या प्रकरणाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने अहवाल मागविण्यात आला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळल्यास आमदार संतोष बांगर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे संतोष बांगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, मोबाईल फोन वापरणे किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणे हे आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभागाकडून कारवाईची मागणी होत आहे.आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group