हिंगोली : कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि शिवीगाळ पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहतात. अशातच आता विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
त्यामुळे आमदार संतोष बांगर पुन्हा वादात सापडले आहेत. त्यांनी आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.
संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन आता राजकारण सुरू झालं आहे. वाहन सोडून देण्यासाठी अधिकाऱ्याला दमदाटी करत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये दिसत आहे.
आरटीओ विभागाच्या एका अधिकाऱ्याला आमदार बांगर यांनी फोनवरून दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
एका शेतकऱ्याची गाडी यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद परिसरात आरटीओच्या अधिकाऱ्याने पकडल्याचं ऑडिओ क्लिपमधून समोर आलं. शेतकऱ्याने आमदार बांगर यांच्या सोबत असलेल्या एका सहकाऱ्याला फोनवरून ही बाब कळवली. यानंतर आमदार संतोष बांगर आणि संबंधित आरटीओ अधिकारी यांच्यात फोनवरून संभाषण झालं.
यामध्ये आमदार बांगर यांनी आरटीओ अधिकाऱ्याला आधी गाडी सोडण्यासाठी विनंती केली..त्यानंतर दमदाटी केल्याचं या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आहे. ही कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल झाली आहे.