छत्तीसगडमध्ये मोठी चकमक; १६ माओवाद्यांचा खात्मा, ३ जवान शहीद
छत्तीसगडमध्ये मोठी चकमक; १६ माओवाद्यांचा खात्मा, ३ जवान शहीद
img
वैष्णवी सांगळे
छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या बिजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली आहे.  बिजापूर गंगानूर येथील जंगलातील घटना काल सायंकाळी साडेचार वाजेपासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही चकमक चालली. या चकमकीत १६ माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर या चकमकीत ३ पोलीस जवान शहीद झाले आहेत. 

सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोलिसांनी १२ माओवादी यांचे मृतदेह सापडले आहे. त्यानंतर पहाटे शोध मोहीम राबविण्यात आली त्यात चार माओवाद्यांचे मृतदेह आढळले. या चकमकीत २० ते २२ माओवादी ठार झाले असावे असा पोलीस दलाचा अंदाज आहे.

गंगालूर परिसरातील जंगलात ही चकमक उडाली आहे. हा परिसर माओवादी कमांडर पापा राव याचा मानला जातो. त्याची या परिसरात मोठी दहशत होती. या जंगलात मोठ्या संख्येने माओवादी असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी चोहोबाजूंनी त्यांना घेराव घातला. त्यानंतर माओवाद्यांनी फायरिंग केली. दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला. त्यात 16 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

बिजापूरचे पोलीस अधिक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजेपर्यंत डीआरजी दंतेवाडा-बिजापूर, एसटीएफष कोबरा आणि CRPF च्या संयुक्त पथकाकडून ऑपरेशन सुरु केले. अद्यापही या परिसरात गोळीबार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group