भाजप आमदाराच्या लेकाची 1111111 रुपयांना अश्वखरेदी, खरेदी केलेल्या नुकरा घोडीची ही वैशिष्ट्यं तुम्हांला माहित आहे का ?
भाजप आमदाराच्या लेकाची 1111111 रुपयांना अश्वखरेदी, खरेदी केलेल्या नुकरा घोडीची ही वैशिष्ट्यं तुम्हांला माहित आहे का ?
img
वैष्णवी सांगळे
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सारंगखेडा हे गाव तापी नदीकाठी वसलेले आहे. येथील एकमुखी दत्ताचे मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या भरणाऱ्या यात्रा उत्सवाला जवळपास 350 वर्षांची परंपरा आहे. येथील अश्व बाजार देशासह परदेशातही प्रसिद्ध आहे. भारतातील पुष्करनंतर येथील अश्व बाजाराची मोठ्या प्रमाणावर गणना होते.

याचठिकणी 11 लाख 11 हजार 111 रुपये किमतीच्या नुकरा जातीच्या घोडीच्या खरेदीची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरु आहे. दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचे सुपुत्र आदित्य कुल यांनी नुकरा जातीची घोडी खरेदी केलीय. जातिवंत आणि उमद्या घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील अश्व बाजार विविध प्रांतातील घोड्यांच्या आगमनाने बहरला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना झटका ! व्लादिमीर पुतिन भारतात येताच अमेरिकेत कहर, थेट...

भरतपूर (राजस्थान) येथील कृष्णवीरसिंग राजपूत यांच्या मालकीची २० महिने वयाची नुकरा जातीची घोडी दौंडचे आमदार राहुल कुल यांचे पुत्र आदित्य यांनी 11 लाख 11 हजार 111 रुपयांमध्ये खरेदी केली. आदित्य हे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज येथील लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. अश्वांची आवड असल्याने खरेदी केल्याचे आदित्य यांनी सांगितले. मागील वर्षीही सारंगखेडा येथे एका घोड्याची खरेदी त्यांनी केली होती.

नुकरा जातीच्या अश्वाची वैशिष्ट्यं
नुकरा ही घोड्यांची एक प्रसिद्ध आणि मौल्यवान जात मानली जाते. हे घोडे त्यांच्या रुबाबदार आणि उंच बांध्यासाठी ओळखले जातात. या घोड्यांची किंमत लाखांपासून कोट्यवधींच्या घरात असू शकते. त्यांना बाजारात खूप मागणी असते. नुकरा घोडे हे त्यांच्या उत्कृष्ट गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत.

सारंगखेडा येथील अश्व बाजार फक्त महाराष्ट्रच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. यंदाही येथील बाजारात विविध राज्यांतून अश्व विक्रीसाठी दाखल झाले आहेत. घोडे बाजारात सुमारे १८०० घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आतापर्यंत घोड्यांच्या विक्रीतून ५० लाखांहून अधिक उलाढाल झाली आहे. असे असले तरी युवराज, सुलतान, रुबी आणि मानसी या अश्वांची चर्चा असून अश्व शौकीन त्यांना पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
horse |
इतर बातम्या
Join Whatsapp Group