पीएफ खातेधारकांसाठी गुड न्यूज आहे. केंद्र सरकार यावेळी पीएफवरील व्याजदर ८.७५ टक्के पर्यंत वाढवू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ होणे अपेक्षित आहे. ज्याचा थेट फायदा तुमच्या ठेवींवरील व्याजावर होईल.
पीएफ खातेधारकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे की, त्यांना यावर्षी त्यांच्या ठेवींवर किती व्याज मिळेल. सुत्रांनी आणि मार्केट तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, सरकार यावर्षी व्याजदर ८.७५ टक्के पर्यंत वाढवू शकतो. याचाच अर्थ जर तुमच्या खात्यामध्ये ६ लाख रुपये असतील तर तुम्हाला ५२,००० रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. जानेवारीमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण जानेवारीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. ८ कोटी पीएफ खातेधारक या निर्णयाची वाट पाहत आहेत.