लग्न मोडल्यानंतर स्मृती मंधानाने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाली , माझं पहिलं अन् शेवटचं प्रेम...
लग्न मोडल्यानंतर स्मृती मंधानाने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाली , माझं पहिलं अन् शेवटचं प्रेम...
img
वैष्णवी सांगळे
गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना चांगलीच चर्चेत आहेत. स्मृती मंधानाचे संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न होणार होते. पण त्यांचे लग्न अचानक मोडले. लग्न मोडल्यानंतर प्रथमच ती माध्यमांसमोर समोर आली. 

दिल्लीतील ॲमेझॉन संभव परिषदेत स्मृती मंधाना सहभागी झाली होती. लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच स्मृती या कार्यक्रमाद्वारे सर्वांसमोर आली. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणाऱ्या मंदिरा बेदी यांनी स्मृतीला अनेक प्रश्न विचारले. 

आयुष्यात चढ-उतार असूनही तू क्रिकेटवर कशापद्धतीने लक्ष केंद्रीत करते असा प्रश्न स्मृतीला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना स्मृतीने स्पष्टपणे सांगितले की, 'मला नाही वाटत की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते. 'माझं पहिलं अन् शेवटचं प्रेम क्रिकेट आहे. सतत प्रेरणादायी ठरणारी भारतीय जर्सी परिधान केली तर तुम्ही तुमच्या सर्व समस्या बाजूला ठेवता आणि जीवनावर लक्ष केंद्रीत करता.

काही दिवसांपूर्वीच स्मृती मानधनाने खुलासा केला होता की, पलाश मुच्छलसोबतचे तिचे लग्न दोन्ही कुटुंबांच्या संमतीने रद्द करण्यात आले होते. ७ डिसेंबर रोजी स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली होती ज्यामध्ये तिने चाहते आणि माध्यमांकडून गोपनीयतेची विनंती केली आणि ती हे प्रकरण इथेच थांबवू इच्छित असल्याचे सांगितले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group