WWE क्लॅश इन पॅरिस २०२५ मध्ये जॉन सीनाने लोगान पॉलला एका कठीण सामन्यात हरवले. दोघांनीही चाहत्यांना एक उत्तम सामना दिला. सीनाचा निवृत्तीचा दौरा सध्या सुरू आहे. त्याने त्याच्या काही जुन्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना केला आहे. सीनाबद्दल एक हृदयद्रावक अपडेट समोर येत आहे.
WWE मधील दिग्गज सुपरस्टार आणि 'चेहरा' म्हणून ओळखला जाणारा जॉन सीना आता आपल्या व्यावसायिक कुस्ती कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर आहे. शनिवारी रात्री (भारतात रविवार, सकाळी ६:३० वाजता सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर) होणाऱ्या ‘सॅटरडे नाईट्स मेन इव्हेंट’मध्ये तो अखेरचा WWE रिंगमध्ये उतरणार आहे.
जॉन सीनाच्या या अखेरच्या लढतीबद्दल संपूर्ण WWE जगतात भावनिक वातावरण आहे. समालोचक आणि माजी रेसलर वेड बॅरेट यांनी एका खासगी वृत्ताशी शी बोलताना हा क्षण WWE इतिहासातील सर्वात भावूक क्षणांपैकी एक असेल, असे मत व्यक्त केले आहे.
वेड बॅरेट यांनी सांगितले की, "सीना निवृत्त होणार हे अपेक्षितच होते, पण हॉलीवूडमधील व्यस्त वेळापत्रकातून १२ महिने रिंगमध्ये उतरून जगभर शहरांमध्ये लढणे, ही त्याची WWE प्रति असलेली वचनबद्धता दर्शवते." सीनाचा शेवटचा सामना गुंथर किंवा एलए नाईट यापैकी एकासोबत होणार आहे.