काल ऑस्कर-2024 हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग भारतात आज सकाळपासून होत आहे.
यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. काही सेलिब्रिटींनी ऑस्कर पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. या पुरस्कार सोहळ्यात जॉन सीनाने देखील हजेरी लावली. यावेळी जॉनला बेस्ट कॉस्ट्युम डिझाइन पुरस्कारांची घोषणा करायची होती.
पण तो या पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी स्टेजवर चक्क नग्न अवस्थेत आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जॉन हा नग्न अवस्थेत स्टेजवर आलेला दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जॉन सीना हा सर्वोत्कृष्ट कॉस्ट्युम डिझाइन या कॅटेगिरीच्या ऑस्कर पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी स्टेजवर नग्न अवस्थेत येतो. त्याच्या हातात एक कार्ड आहे, ज्यावर 'बेस्ट कॉस्ट्युम', असं लिहिलेलं दिसत आहे. यावेळी जॉन म्हणतो,"कॉस्ट्युम खूप महत्वाचे आहेत." त्यानंतर जॉनकडे पाहून सगळे हसायला लागतात.