नारायण राणे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांनी कालच आपल्या भाषणात राजकीय संन्यास घेण्याचे, राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. आता, वय झालंय, थांबायला हवं असे त्यांनी म्हटलं होतं.
चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यकमावेळी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना भोवळ आल्याने सर्वांची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. आपल्या भाषणादरम्यान अखेरच्या टप्प्यात आवाजही बसल्याने राणे यांनी भाषण आटोपतं घेतलं.
विशेष म्हणजे, चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने माध्यमांशी बोलण्याची राणेंनी नकार दिला. तर, या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून नारायण राणे थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले.