ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
राज्यसभा खासदार असलेल्या सोनिया गांधी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. म्हणूनच त्या नियमित तपासणी आणि उपचारांसाठी वेळोवेळी रुग्णालयात दाखल होत असतात. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांना कोणत्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
गेल्या चार-पाच वर्षांत सोनिया गांधी यांची प्रकृती अनेक वेळा बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना श्वसनाचा त्रास देखील आहे. २०२२ मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळीही त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. सध्या त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे.