मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ , EVM मशीनचे सील फुटल्याचा आरोप
मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ , EVM मशीनचे सील फुटल्याचा आरोप
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणूकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. यासाठी मतमोजणीची प्रकिया सुरु आहे. मात्र जळगाव मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालंय.

उमेदवारांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीनचे सील आधीच फुटल्याचा गंभीर आरोप केलाय. यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला. आरोपानंतर मतमोजणी केंद्रात गोंधळ सुरू झाला त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.मुख्य निवडणूक निरीक्षक तसंच आयुक्तांनी या घटनेची माहिती घेतली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group