कराड (भ्रमर वृत्तसेवा) :- पाचपुतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे. डीआरआय विभागाने ड्रग्स बनवले जात असलेले कोंबड्यांचे शेड सील केल असून, याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या बाबा मोरे याला ताब्यात घेतले आहे.
या ठिकाणाहून डीआरआय पथकाने अंदाजे 55 कोटींचा अंमली पदार्थ तयार करण्याचा कच्चा माल व साहित्य ताब्यात घेतले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे.दरम्यान, ही कारवाई एनडीपीएस कायद्यानुसार करण्यात आल्याने ड्रग्जवर कारवाई झाल्याची चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात महिन्यात दुसरी कारवाई झाली आहे. डिसेंबरमध्ये मुंबई पोलिसांनी सावरी गावात छापेमारी करत ड्रग्ज जप्त केले होते. डीआरआय विभागाने केलेल्या कारवाईबाबत सातारा पोलीसही अनभिज्ञ असल्याची माहिती समोर येत आहे.
कराड तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यापासून या ठिकाणी ड्रग्स तयार केले जात होते. सध्या 55 कोटींचे ड्रग्ज तयार होत होते आणि कोट्यावधींचा कच्चा माल या ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कच्च्या मालातून एमडी ड्रग्ज बनवला गेला असता तर हजारो रुपयांचा ड्रग्ज तयार झाला असता. वेळीच पुण्यातील डिआरआय विभागाच्या पथकाने या शेडवर धाड टाकून मोठा ड्रग्जचा साठा ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, नक्की या ठिकाणी कोणते अंमली पदार्थ तयार केले ंजात होते, याबाबत सातारा जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू असून, या कारवाईची माहिती सातारा आणि कराड पोलिसांना नसल्याचेही समोर येत आहे. तर कारवाईसाठी आलेले पथक हे गुजरात व हैदराबाद वरून आल्याचे समजत असून एकूण कारवाई विषयी कुठलीही अधिकृत माहिती दिली जात नाही. परिणामी तपासाअंती या प्रकरणाचीअधिकृत माहिती कळू शकणार आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, तपासात नेमके काय सत्य बाहेर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.