२०२५ मध्ये सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला, पण चित्रपटाने OTT वर कमाल केली
२०२५ मध्ये सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला, पण चित्रपटाने OTT वर कमाल केली
img
वैष्णवी सांगळे
कधी कधी एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाल दाखवू शकत नाही पण त्याची कथा आणि संगीत प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करून बसतं. सनम तेरी कसम हा चित्रपट फ्लॉप गेला पण चित्रपटाची कथा, अभिनय, गाणे आजही कमाल करत आहे. हा चित्रपट रिलीज नंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा बऱ्याच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आणि फ्लॉप झालेल्या चित्रपटाने पुन्हा एकदा मुसंडी मारली. 

आता असाच काहीसा अनुभव 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या रोमँटिक चित्रपट ‘गुस्ताख इश्क’बाबत पाहायला मिळतो आहे.थिएटरमध्ये हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होताच त्याने कमालच केली आहे. विजय वर्मा आणि फातिमा सना शेख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गुस्ताख इश्क’ हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

मात्र, पहिल्याच दिवशी केवळ 50 लाख रुपयांची कमाई करत या चित्रपटाची सुरुवात निराशाजनक ठरली. पहिल्या आठवड्यात चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1.78 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले पण दुसऱ्या आठवड्यात ते घसरून अवघ्या 7 लाख रुपयांवर आले.एका रिपोर्टनुसार, सुमारे 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने भारतात फक्त 1.75 कोटी रुपयांची कमाई केली. ‘गुस्ताख इश्क’ला बॉक्स ऑफिसवर ‘फ्लॉप’ घोषित करण्यात आले.

थिएटरमध्ये अपयश आल्यावर 27 जानेवारी 2026 रोजी ‘गुस्ताख इश्क’ हा चित्रपट जिओहॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. डिजिटल प्लॅटफॉर्मवर येताच चित्रपटाला नवसंजीवनी मिळाली.  IMDb वर चित्रपटाला 7.8/10 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. 
OTT | movies |
इतर बातम्या
Join Whatsapp Group