माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई; 18 OTT प्लॅटफॉर्म
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई; 18 OTT प्लॅटफॉर्म "या" कारणामुळे केले ब्लॉक
img
दैनिक भ्रमर

ऑनलाईन माध्यमांवरील अश्लिल आणि असभ्य मजकूर आणि माहितीबद्दल सातत्याने इशारा दिल्यानंतर फरक पडत नसल्याने आज माहिती आणि प्रसारण मंत्रायलयाने मोठी कारवाई केली आहे. मंत्रालयाने देशभरातील 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत.

ओटीटी वेबसाईटबरोबरच देशभरात १९ वेबसाइट, १० ॲप्स, OTT प्लॅटफॉर्मचे ५७ सोशल मीडिया हँडल देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


या विविध ऑनलाईन, डिजीटल माध्यमांवरील मजकूर IT कायदा, भारतीय दंड संहिता आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्यासह अनेक कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
OTT |
इतर बातम्या
Join Whatsapp Group