अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'जेईई मेन्स २०२६' (सत्र १) परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यंदा देशभरातून सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी (JEE Main) ही परीक्षा दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सत्र 1 चे निकाल अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध केले आहेत.
यावर्षीच्या निकालात 12 उमेदवारांनी 100 पर्सेटाईल गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामध्ये श्रेयस मिश्रा, नरेंद्रबाबू गरि महित, शुभम कुमार, कबीर छिल्लर, चिरंजीब कर, भावेश पात्रा, अनय जैन, अर्णव गौतम, पासला मोहित, माधव विराडिया, पुरोहित निमय आणि विवान शरद या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या यशाबद्दल देशभरातून गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यात महाराष्ट्रातील माधव विराडिया या विद्यार्थ्याचाही समावेश आहे.