आजचे राशिभविष्य १८ मार्च २०२६ : तुमच्या राशीत आज काय खास ? वाचा
आजचे राशिभविष्य १८ मार्च २०२६ : तुमच्या राशीत आज काय खास ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
मेष - आज कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीच्या यशामुळे आनंदाचे वातावरण असेल. जे लोक परदेशात करिअर किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत त्यांच्या मार्गातील अडचणी दूर होतील. खूप दिवसांनी प्रिय व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांचे लग्न निश्चित होऊ शकते. ज्यांचे प्रेमसंबंध आहेत त्यांचे कुटुंबीय त्यांचे नाते स्वीकारू शकतात आणि लग्नाला मान्यता देऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य सामान्य राहील.

वृषभ - आजचा दिवस तुमच्यासाठी भलताच आनंदाचा असणार आहे. कोणत्याही कामात घाईत निर्णय घेऊ नका. नाही तर परिणाव वेगळे येतील. तुमची ऊर्जा आणि उत्साह आज कायम राहिल. त्यामुळे तुम्ही तुमची कामे पटापट पूर्ण कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत लागून राहिलेली चिंता आता हळूहळू दूर होईल. व्यापाराशी संबंधित कामासाठी प्रवास घडेल. विद्यार्थ्यी मानसिक तणावातून बाहेर पडतील.

मिथुन - दिवस थोडा धावपळीचा राहणार आहे. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. यामुळे तुम्हाला अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. करिअर असो किंवा व्यवसाय, संघर्षानंतरच यश मिळेल. अशा परिस्थितीत तुमच्या कोणत्याही कामात निष्काळजी राहू नका. तसेच कामाला इतरांच्या भरवशावर सोडण्याची चूक करू नका. कठीण काळात तुमचा जोडीदार तुम्हाला पाठिंबा देईल.

कर्क - आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आणि मौजमस्तीचा असणार आहे. तुम्ही कुटुंबासोबत मस्त दिवस घालवाल. त्यामुळे सर्व संभ्रम दूर होतील. मुलांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. जीवनसाथीला नोकरीत प्रमोशन मिळाल्याची बातमी ऐकून घरातील वातावरण अधिकच आनंदमय असेल. आज एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्याल. सोसायटीच्या कामात लक्ष घालाल. शेजारणीशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून राहा. 

सिंह - आज तुमच्या धाडस आणि पराक्रमाचं कौतुक होईल. पण लोकांकडून काम करून घेण्यासाठी तुम्हाला थोडं सबुरीने घ्यावं लागेल. डोक्यावर बर्फ ठेवून परिस्थिती हाताळावी लागेल. कारण तुमचा कडक स्वभाव अनेकांना त्रासदायक ठरू शकतो. अनोळखी लोकांपासून दूरच राहणं योग्य ठरेल. कौटुंबिक समस्या वाढणार असल्याने थोडं टेन्शन येईल. पण समजूतदारपणे परिस्थिती हाताळल्यास सर्व गोष्टी अटोक्यात येतील. 

कन्या - आजचा दिवस भाग्यवान असणार आहे. सर्व नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. जे लोक बऱ्याच काळापासून त्यांच्या कामाच्या ठिकाणी बदलीचा विचार करत आहेत त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत बनतील. संचित संपत्ती वाढेल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेषतः फायदेशीर ठरेल, मोठे पद मिळू शकते.

तुळ - आजच्या दिवशी अनावश्यक खर्चांपासून दूर राहा. एखाद्या सरकारी कामात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कोणी तरी या कामात बाधा टाकण्याचा प्रयत्न करेल. देवाण-घेवाणाशी संबंधित एखादं प्रकरण कोर्टकचेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आज कपडे किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी खरेदी कराल. त्यामुळे तुमचा खर्च वाढणार आहे. घरी पाहुण्यांचं आगमन होणार असल्याने घरातील वातावरण आनंदी होईल.

वृश्चिक - आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या छोट्या मोठ्या पार्टीचं आयोजन कराल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय असेल तर फायद्याचा ठरणार आहे. चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसाय अधिक वाढवण्यासाठी मोठा प्लान करण्याची शक्यता. नवीन वाहन खरेदी करण्याची प्रबळ इच्छा होईल. तुमच्या आवाक्यात असेल तरच वाहन खरेदी करा.

धनु - व्यापारात आज मोठा लाभ होणार आहे. तुमची मिळकत पूर्वीपेक्षा अधिक होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला मिळतील. तुमचं दीर्घकाळापासून अडकलेलं सरकारी काम पूर्ण होईल. मुलाला एखाद्या मोठ्या कोर्ससाठी प्रवेश घेऊन द्याल. फिरायला गेल्यावर तुम्हाला महत्त्वाची बातमी मिळेल. त्याचा भविष्यात खूप फायदा होणार आहे. प्रेयसीपासून चार हात लांब राहा. नाही तर अनावश्यक खर्च वाढेल. 

मकर - आजचा दिवस तुमच्यासाठी यशस्वी ठरणारा आहे. पण घरात बायकोसोबत थोडीबहूत कुरबूर होईल. नवऱ्याच्या वागण्याचा त्रास वाटेल. कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडण्याची शक्यता असून त्यासाठी रुग्णालयात धावपळ करावी लागणार आहे. कामावरील सहकाऱ्याने दांडी मारल्याने तुमच्यावरच कामाचा सर्वाधिक बोजा येईल. महिलांसाठी आजचा दिवस अधिक खर्चिक आहे. साड्यांवर अधिक खर्च करू नका. 

कुंभ - आजचा दिवस हा परोपरकाराचा ठरणार आहे. आज तुमच्या हातून चांगले कार्य घडतील. इतरांना मदत कराल. दुसऱ्यांच्या प्रकरणात विनाकारण लक्ष घालू नका. कामाच्या ठिकाणी बॉससोबत वाद होईल. पण संयमाने घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी अधिककाळ अबोला धरणं तुमच्या अंगलट येऊ शकतं. त्यामुळे तुम्हालाच मानसिक त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी इतरांच्या सांगण्यानुसार वागू नका. तुमच्या मनाला जे पटत त्यावरच निर्णय घ्या. 

मीन -आज तुम्ही आवश्यक गोष्टींवरच खर्च करा. नाही तर नुकसान होईल. वाढते खर्च तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. एखाद्या आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. दूरचा प्रवास टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्या जुन्या चुकांची उजळणी होऊ शकते. नको त्या सहकाऱ्यांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं
इतर बातम्या
Join Whatsapp Group