मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कुंभमेळ्यामुळे व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसलेचं लग्न हा चर्चेचा विषय ठरला आहे. मोनालिसा ही चित्रपटात दिसणार म्हणून तिची एक वेगळीच चर्चा होतीच. पण, मागील आठवड्यात तिने फरमान खान या तिच्या प्रियकराशी तिने लग्न केलं. या दोघांनी हिंदू रितीप्रमाणे लग्न केलं. एकीकडे या लग्नावर मोनालिसाच्या कुटुंबियांनी या प्रश्न उपस्थित केले तर काहींनी या लग्नाला लव्ह जिहादचं नाव दिलं.अशातच या जोडप्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओने एकच खळबळ उडवून दिली आहे.
लग्नानंतर फक्त १० दिवसांतच परिस्थिती गंभीर झाली आहे. मोनालिसाने आपल्या फेसबुक अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यात ती आणि फरमान एकत्र दिसत आहेत. या व्हिडीओत मोनालिसा घाबरलेल्या स्वरात म्हणते, "आम्हाला खुलेआम जीवे मारण्याच्या आणि हल्ल्याच्या धमक्या येत आहेत. हा व्हिडीओ आणि लेटर मी पोलीस, मुख्यमंत्री, कमिशनर आणि मीडियाला पाठवत आहे. प्लीज आम्हाला मदत करा!"
दोघांनीही आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत तातडीने संरक्षणाची मागणी केली आहे. हे अंतरधर्मिय लग्न 'लव्ह जिहाद' म्हणून काही दिग्दर्शक (उदा. सनोज मिश्रा) आणि सोशल मीडियावरील काही गटांकडून टीकेचं केंद्र ठरलं आहे. मोनालिसाच्या कुटुंबानेही विरोध केला असून, तिच्या वडिलांनी 'फसवणूक' आणि 'जादू-टोना'चा आरोप केला आहे.