आजचे राशिभविष्य 24 मार्च 2026: तुमच्या राशीत आज काय खास ? वाचा
आजचे राशिभविष्य 24 मार्च 2026: तुमच्या राशीत आज काय खास ? वाचा
img
वैष्णवी सांगळे
मेष -आज तुमचा बहुतेक दिवस प्रवासात जाईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. घरातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल. एखाद्या जवळच्या मित्राचीही अचानक भेट होईल, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. आधीचे अपयश धुवून चांगलं यश मिळेल.



वृषभ - आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.आज तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल. डोळ्यांच्या समस्यांसाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घ्यावासा वाटू शकतो. आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मिथुन - आज नव्या नोकरीची, मोठ्या पगाराच्या कामाची ऑफर मिळेल, नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला कामात हमखास यश मिळेल. आजचा दिवस तुमच्या कामात आनंद घेऊन येईल. या राशीत जन्मलेल्या अभियंत्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल.

कर्क -  आज राजकारणात गुंतलेल्या व्यक्तींनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल कराल. आज तुमचे आरोग्य सामान्य राहील.कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. जोडीदाराकडून चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील.

सिंह - व्यवसायात अनुकूल परिस्थिती कायम राहील. आज तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवाल. आज तुम्हाला वाहन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदार एकमेकांच्या भावनांचा आदर करतील.

कन्या - आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. आज व्यावसायिक सौदे अंतिम होतील. आज तुम्ही नवीन ग्राहकांना भेटाल. अविवाहित जोडपी लवकरच त्यांचे नातेसंबंध दृढ करतील. तुम्ही मित्रांसोबत काही आनंदाचे क्षण घालवाल. कोणाच्यातरी मदतीचा तुम्हाला फायदा होईल.

तुळ - आज, तुम्ही तुमच्या महत्वाच्या कामाची आखलेली योजना यशस्वीपणे पूर्ण कराल. जे नोकरीत आहेत ते त्यांना नेमून दिलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून चांगली बातमी मिळेल.

वृश्चिक - आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल आणि तुम्ही आयुष्य पुरेपूर जगाल. या राशीत जन्मलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची हुशारीने तयारी करावी. तुम्ही तुमच्या पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.

धनु - आजचा दिवस मनासारखा जाईल. उधारा देताना जपून रहा. आज ऑफीसच्या कामात यशाचा एक नवीन संधी दिसेल. जर तुम्ही काही काळापासून वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्यासारखा छान दिवस नाही.

मकर - आज तुम्ही फॅक्टरीसाठी यंत्र खरेदी करण्याचा विचार करू शकता. कुटुंबियांमध्ये प्रेम वाढेल. तुमच्या जोडीदाराला अपेक्षित भेटवस्तू मिळेल. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तांत्रिक शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

कुंभ - तुम्हाला तुमच्या मुलांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमचे नातेसंबंध अधिक सौहार्दपूर्ण होतील. या राशीच्या व्यक्तींचे प्रकल्प लवकरच पूर्ण होतील आणि लोक तुमच्या कामावर खूश होतील. आज तुम्हाला पदोन्नतीची बातमी मिळू शकते. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारतील.

मीन - आज तुम्ही पाहुण्यांच्या आगमनाच्या तयारीत बिझी असाल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. स्थापत्य अभियंते आज त्यांचे पूर्वीचे प्रकल्प पूर्ण करतील. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group