नाशिक: तुम्ही पाहिलं असेल की बरेच लोक त्यांच्या फोन कव्हरमध्ये नोटा ठेवतात. जेव्हा ते कुठे बाहेर जातात तेव्हा त्यातून पैसे काढून सहजपणे पेमेंट करतात. काहींसाठी तर हा आपत्कालिन फंड असतो. अनेकजण फोन कव्हरला मिनी वॉलेट करतात. मात्र याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का?तुम्हाला ही सवय असेल तर आताच का बदलायला हवी, जाणून घ्या कारणं.
या सवयीचे गंभीर परिणाम
फोन ओव्हरहीट होणे: फोन वापरताना किंवा चार्ज करताना उष्णता बाहेर पडणे आवश्यक असते. नोटा इन्सुलेटर म्हणून काम करतात, ज्यामुळे उष्णता आतच अडकून राहते, परिणामी बॅटरी फुगू शकते किंवा प्रोसेसर मंदावतो.
आगीचा धोका: फास्ट चार्जिंग दरम्यान तापमान जास्त वाढल्यास, आत ठेवलेल्या कागदी नोटांमुळे फोनला आग लागू शकते किंवा स्फोट होण्याची भीती असते.
आरोग्याला धोका: नोटा अनेक लोकांच्या हातातून फिरत असतात, त्यावर हजारो जीवाणू असतात. हे जंतू फोनच्या कव्हरद्वारे थेट तुमच्या हातात आणि चेहऱ्यापर्यंत पोहोचतात.
कॅमेरा खराब होणे: नोटा कव्हरमध्ये सरकल्यामुळे कॅमेरा किंवा फ्लॅश झाकला जाऊ शकतो.
सुरक्षितता: फोन हरवल्यास पैसे आणि कार्ड्स दोन्हीही जातात.
म्हणून, फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची सवय तातडीने बदलणेच सुरक्षित आहे.
या सवयी बदलण्यासाठी काही टिप्स:
नोटा ठेवण्यासाठी लहान पाकीट वापरा,फोनच्या कव्हरमध्ये कप्पे असतील तर फक्त एखादेच कार्ड ठेवा, पैसे नको.