इराण आणि अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर जगात कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. कच्च्या तेलाच्या तुटवड्यानंतर आणि होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसल्या. सतत कच्च्या तेलाच्या किमती वाढत होत्या. भारतात कच्च्या तेलाचा तुटवडा आहे. सरकार अनेक मोठे निर्णय घेत आहे. मात्र, गेल्या काही दिवसात महागाई वाढलीये. सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीसोबतच थेट सीएनजीचेही दर वाढताना दिसले.
आता एक आनंदाची बातमी पुढे येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीचे दर 125 वरून थेट 96 रूपये प्रति लिटर झालेत. हा अत्यंत मोठा दिलासा म्हणावा लागेल. कारण सतत दरवाढ होताना दिसतंय. त्यातच हा निर्णय घेण्यात आला. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर वाढल्याच्या बातम्यांमध्ये आता दिलासा देणारी बातमी आहे.
थेट ऑटो एलपीजीचे दर कमी झाले. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. त्यामध्येच आता ऑटो एलपीजीचे दर कमी झालेत. यासोबतच पंपांवर एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणतीही टंचाई नसल्याची माहिती पुढे येतंय. तब्बल 30 रूपयांनी दर कमी झाल्याने रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाल. सतत सीएनजी, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत असल्याने रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांनी भाव वाढ करण्यास सुरूवात केली होती.
थेट सामान्य लोकांना याचा फटका बसत होता. इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान ऑटो एलपीजी गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली होती. आता दरवाढीत मोठी कपात करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो चालकांना मोठा दिलासा मिळाला. 60 रूपयांपर्यंत दर कमी होण्याचा अंदाज आहे.