बहुप्रतीक्षित मान्सून बारसण्यासाठी अडथळे निर्माण झाले असून अजूनही पावसाने आपलॆ दर्शन हवे तसे दिलेले नाहीये. दरम्यान आता पुन्हा एक अपडेट समोर आली असून काहीसा दिलासा मिळणार असा अंदाज आहे.
15 जून 2026 पासून राज्यात पावसाचा अंदाज होता. मात्र, मॉन्सूनने पुन्हा एकदा दिशा बदलली. मॉन्सून अरबी समुद्रात आहे. अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल थांबलीये. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वादळ्याने मॉन्सूनला पुढे येण्यास अडथळा निर्माण झाला. जोपर्यंत हे वारे जाणार नाही, तोपर्यंत मॉन्सूनची स्थिती जैसे थे असणार. 20 जूनला मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, 11 जून त्यानंतर 15 जून आणि आता थेट 20 जून म्हटल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे. पेरण्या रखडल्या असून पाणी पातळी खाली जात आहे. त्यामध्येच एल निनोचे मोठे संकट राज्यावर आहे. यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना जोपर्यंत आवाहन केले जात नाही, तोपर्यंत पेरण्या करण्यास मनाई केली. यामुळे दुबार पेरणीचे संकटच राहणार नाही.
20 जूनला राज्यातील जवळपास भागात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात उष्णता प्रचंड वाढताना दिसत आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याने ते एक वेगळे संकट आहे. एल निनोचा प्रभाव पावसावर असेल. ज्यामुळे अनेक भागात पाऊस कमी होऊ शकतो. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक हवामान संस्थांनी अगोदरच धोक्याचा इशारा दिला आहे.
मॉन्सून राज्यात येण्यास उशिर लागणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची पूर्ण तयारी करून घेतली आहे. मॉन्सून सतत लांबणीवर पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता आहे. पेरण्या रखडल्या आहेत. 20 जूनला पावसाची अपेक्षा आहे. काही भागात अजूनही वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. अनेक अंदाज पावसाबद्दल सध्या वर्तवले जात आहेत.