भारतीय 'बासमती' जगात भारी!
भारतीय 'बासमती' जगात भारी!
img
Dipali Ghadwaje
भारत हा कृषीप्रधान देश आहे. जागतिक स्तरावर तांदूळ निर्यात करण्यात भारताचा पहिला क्रमांक आहे. अशातच भारतातील बासमती तांदूळ हा "जगातील सर्वोत्कृष्ट तांदूळ" म्हणून गौरविण्यात आला आहे. जगातील सर्वोत्तम 6 तांदळाच्या वाणांच्या यादीत भारताच्या बासमती तांदळाला पहिलं स्थान मिळालं आहे. 

फूड आणि ट्रॅव्हल गाईड टेस्ट "ॲटलसने" जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत भारतीय बासमती तांदळाला प्रथम स्थान दिलं आहे. त्यामुळे आता भारतीय बासमती तांदूळ 'नंबर 1' ठरला आहे. तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इटलीचा अरबोरियो तांदूळ तर, पोर्तुगालचा कॅरोलिनो तांदूळ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

टेस्ट ॲटलसने, जगातील सर्वोत्तम तांदूळ श्रेणीत टॉप-6 तांदळाच्या वाणांना स्थान देण्यात आलं आहे. पारंपारिक खाद्यपदार्थ, पाककृती आणि संशोधन यांचा आढावा घेणार्‍या टेस्ट ॲटलस या फर्मने जगातील सर्वोत्तम तांदळाच्या जातींची यादी जाहीर केली आहे, ज्या भारतातील बासमती तांदूळ जगातील सर्वोत्तम तांदूळ म्हणून निवडला गेला आहे. भारतात उत्पादित होणारा बासमती तांदूळ हा प्रीमियम दर्जाचा सुगंधी तांदूळ आहे, ज्याला जगभरात मोठी मागणी आहे.

लोकप्रिय खाद्य आणि ट्रॅव्हल गाईड, टेस्ट ॲटलसकडून भारताच्या बासमती तांदळाला 'जगातील सर्वोत्तम तांदूळ' म्हणून गौरवण्यात आलं आहे. टेस्ट ॲटलसने 2023-24 च्या वर्षअखेरीस यादी जाहीर केली आहे. 

दरम्यान टेस्ट ॲटलसने बासमती तांदळाबाबत पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "बासमती हा मूळतः भारत आणि पाकिस्तानमध्ये उगवलेली आणि लागवड केली जाणारी लांब आकाराच्या तांदळाचा प्रकार आहे. या तांदळाचे वैशिष्ट्य त्याच्या चव आणि सुगंध आहे. हा तांदूळ अतिशय पौष्टिक आणि खमंग आहे. एकदा शिजल्यावर, याचे दाणे वेगळे राहतात आणि एकमेकांना चिकटत नाहीत. चांगले आणि सर्वोत्तम बासमती दाणे किंचित सोनेरी रंगाचे असतात.''

भारत तांदळाचा प्रमुख निर्यातदार
तांदूळ निर्यातीत भारत जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार बनला आहे. या कालावधीत, भारताने विक्रमी 23 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला आहे, जो जागतिक बाजारपेठेतील एकूण तांदळाच्या 40.8 टक्के आहे. जगभरातील बासमती तांदळाच्या निर्यातीच्या बाबतीत, भारत 65 टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो, तर पाकिस्तान 35 टक्के बासमती तांदूळ निर्यात करतो.

जगातील सर्वोत्कृष्ट तांदळाची यादी
  • बासमती  : भारत
  • अरबोरियो  : इटली
  • कॅरोलिनो : पोर्तुगाल
  • बोम्बा : स्पेन
  • उरुचिमाय : जपान
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group