नागपंचमीच्या दिवशी उज्जैनमध्ये दुर्घटना; मंदिरात चेंगराचेंगरी, भाविक जखमी
नागपंचमीच्या दिवशी उज्जैनमध्ये दुर्घटना; मंदिरात चेंगराचेंगरी, भाविक जखमी
img
Nandini khandare More

श्रावणातील तिसरा सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भाविकांची विक्रमी गर्दी झाली. नागपंचमीच्या दिवशी नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी उज्जैनमध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. दरम्यान , उज्जैनमध्ये नागपंचमीच्या उत्साहाला गालबोट लागलं आहे. महाकालेश्वर मंदिरातील नागचंद्रेश्वर मंदिर दर्शनासाठी उघडताच हजारो भाविकांनी गर्दी केली. यावेळी बॅरिकेड्सजवळ गर्दी अनियंत्रित झाल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
 
मिळालेल्या माहितीनुसार ,  दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात बॅरिकेट्सजवळ गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली. त्यामुळे मंदिर परिसरात चेंगराचेंगरी परिस्थिती झाली. या घटनेने नागपंचमी सणाला गालबोट लागल्याचे बोललं जात आहे. मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंदिर समितीने केली आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेने अनेक भाविकांची तब्येत बिघडली. अनेक भक्त बेशुद्ध झाल्याचेही समोर आलं. मंदिरात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयातही दाखल केलं आहे. आतापर्यंत या घटनेत 13 भाविक जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. श्रावणा महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भगवान महाकाल यांच्यासोबत नागचंद्रेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, या मंदिरात सकाळपासून 5.50 लाख भाविकांनी दर्शन घेतलं आहे. त्यात नागचंद्रेश्वर मंदिर हे वर्षातून एकदाच उघडले जाते. त्यामुळे दरवर्षी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उज्जैनला येतात.

मंदिर समितीने चेंगराचेंगरीचं वृत्त फेटाळलं. भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंदिर समितीने केलं आहे. नागपंचमी, श्रावण सोमवार आणि भगवान श्री महाकालेश्वर मंदिरात भक्तांची मोठी संख्या वाढली. आतापर्यंत 6.19 लाख भाविकांनी दर्शन घेतलं. या मंदिरात भाविकांनी अनेक रांगा लावल्या आहेत. भाविकांनी केवळ अधिकृत सूचनेवर विश्वास ठेवावा, अशी माहिती मंदिर समितीने दिली आहे.

नेमकं काय घडलं?

महाकाल मंदिरातील नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनाच्या रांगेत शॉक लागत असल्याची अफवा भक्तांमध्ये पसरली. त्यामुळे भक्त भयभीत झाले. तसेच हरिसिद्धी मंदिराच्या बॅरिकेट्सच्या जवळील डीपीजवळ देखील शॉक लागत असल्याची अफवा भक्तांमध्ये पसरली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी चेंगराचेंगरी सारखी निर्माण झाली. यावेळी भक्त एकमेकांच्या अंगावर पडले. या घटनेत अनेक भक्त जखमी झाले. त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Ujjain |
इतर बातम्या
Join Whatsapp Group