उद्या दारू मिळणार नाही ! महाराष्ट्रात ड्राय डे, किती वाजेपर्यंत दुकाने बंद ?
उद्या दारू मिळणार नाही ! महाराष्ट्रात ड्राय डे, किती वाजेपर्यंत दुकाने बंद ?
img
Nandini khandare More
तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या दारू मिळणार नाही. २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या महात्मा गांधी जयंती असल्याने महाराष्ट्रात मद्यविक्री बंद राहणार आहे. त्यामुळे राज्यातील परवानाधारक वाईन शॉप्स, बिअर शॉपी, देशी दारूची दुकाने तसेच मद्यविक्रीची परवानगी असलेल्या हॉटेलमधील परमिट रूम्सना ड्राय डेच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

महाराष्ट्रात मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यासाठी काही दिवस कायद्यानुसार निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई प्रोव्हिजन अॅक्ट, १९४९ अंतर्गत परवानाधारक मद्यविक्रीची ठिकाणे विशिष्ट दिवशी बंद ठेवण्याची तरतूद आहे. गांधी जयंती हा त्यापैकी एक महत्त्वाचा दिवस आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये २ ऑक्टोबर (गांधी जयंती) आणि २० ऑक्टोबर (दसरा/विजयादशमी) या दिवशी मद्यविक्रीवर बंदी राहण्याची नोंद आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group