मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून देशात सध्या मोठा धुमाकूळ निर्माण झाला आहे. याचदरम्यान एका बड्या नेत्याने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
यांच्याविरोधात देशातील विरोधी पक्ष आणि जनता आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांमधील नेते सहभागी झाले आहेत. अशातच आता आम आदमी पार्टीचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ज्ञानेश कुमार यांच्यासंदर्भात मोठा दावा केला. येत्या १० ऑक्टोबरच्या आधी ज्ञानेश कुमार हे राजीनामा देतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सौरभ भारद्वार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सूत्रांनी त्यांना माहिती दिली आहे की १० ऑक्टोबरपूर्वी ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतर येथे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. जून-जुलैमध्ये, नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केले होते. जंतर मंतरवर महिनाभर चाललेल्या आंदोलनाचे अभिजीत दीपकेने नेतृत्व करून धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले होते.
स्वतःला 'जनरेशन जी'ची संघटना म्हणणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सीजेपीने आंदोलन केले. या आंदोलनानंतर आता सीजेपीने १० ऑक्टोबर रोजी जंतर मंतरवर आंदोलनाची घोषणा केली आहे. सीजेपीचा दावा आहे की, या आंदोलनासाठी देशभरातून लोक एकत्र जमतील आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल.