देशभरात नवरात्रोत्सवाची तयारी मोठ्या उत्सहाने सुरु आहे. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. याचदरम्यान आता एक बातमी समोर आली आहे. डाऱ्यात गरबा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामुळे विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहेत. याविरोधात त्यांनी एक मोठी मागणी केली आहे.
या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेने सांगितले की, गरबाोत्सवात अश्लील गाण्यांवर बंदी आणा. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी पालकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गरबा उत्सवात महिलांच्या सुरक्षेसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयोजकांना कठोर नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर गरब्यात कडक नियमांची विश्व हिंदू परिषदेने मागणी केली आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे. तसेच या नियमांमुळे तरुणांच्या उत्साहावर परिणाम होणार आहे.
११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गरबा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी भंडाऱ्यात विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्तीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. गरबा आयोजकांनी कोणतीही अश्लील गाणी किंवा चित्रफीत न वाजवण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. सध्या लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये हिंदू महिला आणि मुलींना प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे.
विश्व हिंदू परिषदेने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ शेअर करून मुलींना आकर्षित केले जाते. त्यानंतर त्यांना जाळ्यात ओढले जाते. मुलींच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवावे आणि त्यांच्याशी संवाद साधावा. गरब्याचे आयोजन करणाऱ्यांनी व पालकांनी मुलींच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असं सांगण्यात आले आहे. आता यावर प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे लक्ष असणार आहे.