दुबईहून इस्त्रायलच्या तेल अवीवकडे जाणाऱ्या दुबईप्लायच्या विमानात घडलेली घटना संपूर्ण जगाचीच अत्यंत धक्कादायक होती. थेट ओमानच्या को पायलटने भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करत विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला.
या विमानात जवळपास इस्त्रायली नागरिक होते. स्मित मच्छार यांनी गंभीर जखमी होऊन ही हा हल्ला रोखला. याबाबत आता मोठे खुलासे होत आहेत. ओमानच्या को पायलटबद्दल एका मागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. 2024 मध्येच त्याच्यावर कारवाई झाली होती. भारतीय पायलटमुळे एक मोठा दहशतवादी हल्ला टळला. त्यातच आता धक्कादायक माहिती पुढे आली.
युएईच्या अटार्नी जनरल हमाद सैफ अल शामसीने फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या घटनेबद्दल मोठा खुलासा केला. तपासात एक बाब पुढे आली की, कट्टरपंथी विचारधारेसोबत हा सुरूवातीच्या काळातच पायलट ऑस्टेलियात संपर्कात आला. ओमानी पायलट अल हम्मामी 2015 ते 2017 मध्ये मेलबर्नच्या आरएमआयटी विश्वविद्यालयमध्ये शिक्षण घेत होता. युएईच्या तपासानुसार, 2017 मध्ये त्याने जहालवादी साहित्य वाचण्यास सुरूवात केली.
ऑनलाईन त्याने काही व्हिडीओही बघितले. दहशतवादी संघटना आणि आत्मघाती हल्ले कसे करायचे हे तो सतत बघत होता. आरएमआयटीशी संबंध मस्जिदमध्येही तो जात होता. त्यावेळी तो काही लोकांच्या संपर्कात आला. माय सेंटरशी संबंधित लोकांच्या थेट संपर्कात आला. हे केंद्र एक लेबनानी व्यक्ती अबू हम्जा चालवत होता. यातील हादरवणारी बाब म्हणजे 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्याला प्रेरित होतच त्याने पायलट बनवण्याचा निर्णय घेतला.
ओमान एअर, रॉयल एयर, मोरक्को आणि त्यानंतर फ्लायदुबई असा त्याचा प्रवास राहिली. फ्लायदुबईमध्ये काम करत असताना त्याने तेल अवीवला काही वेळ जात असताना माहिती गोळा केली. दोन वेळा गेल्यानंतर तिसऱ्यावेळी त्याने हल्लाचा कट रचला. मात्र, क्रू मेंबरमध्ये त्याचा जवळचा मित्र असल्याने त्याने नियोजित कट ऐनवेळी पुढे ढकलला.