फ्लायदुबईच्या विमान प्रकरणाने संपूर्ण जग हादरले होते. दरम्यान आत अय प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. फ्लायदुबईच्या विमान प्रकरणात को पायलटने भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर हल्ला केला. त्यातच गंभीर जखमी असताना भारतीय पायलटने 180 लोकांचा जीव वाचवला.ओमानी पायलट खुलासे करत असतानाच आता तपास यंत्रणांनी थेट अजून दोन पायलटला ताब्यात घेतले. ज्यामुळे जगात मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. यामुळे सर्वांचीच झोप उडाली. युएई पोलिसांनी फ्लायदुबई एअरलाईनमध्ये काम करणाखऱ्या मालदिवच्या 2 पायलट्सना ताब्यात घेतले. ही एक अत्यंत मोठी कारवाई म्हणावी लागेल.
फ्लायदुबईत मालदिवचे दोन पायलट नुकताच रूजू झाले होते. 3 ऑक्टोबर रोजीच यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतंय. मालदिवच्या दूतावासांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन्ही पायलटला ताब्यात घेतल्यानंतर या कारवाईबद्दल त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. धक्कादायक माहिती म्हणजे मालदिवचे हे दोन्ही फ्लायदुबईत काम करणारे पायलट हम्मामीच्या संपर्कात होते. हम्मामी ज्या इमारतीमध्ये राहण्यास होता, त्याच इमारतीमध्ये हे दोघेही राहत.
या कटात या दोन पायलटची नक्की काय भूमिका होती, याचा तपास अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, खरोखरच यांचा काही सहभाग आहे का? याचा शोध हा घेतला जात आहे. मात्र, फ्लायदुबईतील घटनेने जगाला धक्का बसला. असे काही होऊ शकते, याचा कोणीही विचार करू शकत नाही. थोड्यात एक मोठी घटना होण्यापासून वाचले.