महिन्याचे शेवटचे ६ दिवस ! लाडक्या बहिणींना ₹१५०० कधी मिळणार? मोठी अपडेट समोर
महिन्याचे शेवटचे ६ दिवस ! लाडक्या बहिणींना ₹१५०० कधी मिळणार? मोठी अपडेट समोर
img
Nandini khandare More
महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणींचं लक्ष सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याकडे लागलं आहे. ऑक्टोबर महिना संपायला अवघे ६ दिवस शिल्लक असताना, लाभार्थी महिलांच्या खात्यात ₹१,५०० कधी जमा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये मिळाल्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे पैसे कधी खात्यात जमा होणार, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातोय.

लाडक्या बहि‍णींना दिवाळीआधी पैसे मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता रखडल्यामुळे लाभार्थी महिलांचं लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण याबद्दल सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे ३००० रुपये एकत्र मिळणार? लाडक्या बहि‍णींना सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये आणि ऑक्टोबर महिन्याचे १५०० रुपये असे एकूण ३००० रुपये एकत्र मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. असं झाल्यावर महिलांना दिवाळीच्या खरेदीसोबत घरखर्चासाठी आर्थिक मदत मिळू शकते. पण दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्याबद्दल अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे लाभार्थींनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो? महाराष्ट्र सरकारने महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य वाढवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातल्या पात्र महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या मदतीने १५०० रुपये जमा केले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, योजनेत ई-केवायसी आणि पात्रतेच्या पडताळणीनंतर अनेक महिलांची नावं लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आली होती. अधिकृत घोषणेकडे महिलांचं लक्ष ऑक्टोबर महिना संपल्यावर काहीच दिवस शिल्लक असल्याने लाडक्या बहि‍णींना हप्ता कधी मिळणार, याची उत्सुकता आहे. पण पैसे जमा होण्याची निश्चित तारीख किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरचे ३००० रुपये एकत्र मिळण्याबाबत सरकारने अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष द्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group