लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोजच अपडेट येत आहे. या योजनेचा सुरुवातीला सरसकट लाभ देण्यात आला होता मात्र त्यानंतर आता टप्पटप्प्याने अपात्र महिला लाभार्थ्याना कमी करण्यात येत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यातून अपात्र महिलांना बाद करण्यात आले आहे.
या योजनेत अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली तर १४ हजार २९८ पुरुषांनी लाभ घेतला आहे. २२८९ सरकारी महिला, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ३२ लाख महिला, ६५ वर्षांपवरील १ लाख १० हजार महिला आणि एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी लाभ घेतला आहे, त्यातील चार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
आतापर्यंत जवळपास ४० लाख २८ हजार महिला अपात्र ठरल्या आहेत. अनेक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत. तरीही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांच्या नावापुढे फायनान्शियल स्ट्राँग कडिशन अशा शेरा मारुन लाभ बंद करण्यात आला आहे. याचसोबत जवळपास १४ लाख महिला या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या योजनेत त्यांना फक्त ५०० रुपये हप्ता मिळतो.
चारचाकी वाहन असलेल्या महिलांची संख्या सव्वा दोन लाख आहे. याचशिवाय ६० हजार महिलांना स्वतः हून लाभ नाकारला असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण आकडेवरीनुसार, जवळपास ५० लाख महिलांचा लाभ बंद केला असल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यातील एकूण २.५९ कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेतील पडताळणी अजून सुरु आहे.