बीचवर फिरायला गेलेल्या तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश
बीचवर फिरायला गेलेल्या तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश
img
Nandini khandare More
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जण संकटात सापडले. या दुर्दैवी घटनेत तिघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , कर्नाटकच्या कुमटा तालुक्यातील गोकर्ण येथील दुब्बानाशाशी बीचवर पर्यटकांच्या एका ग्रुपमधील पाच जण समुद्राच्या प्रचंड लाटांच्या विळख्यात आले. यामुळे त्यातील तीन जणांचा मृत्यू झाला. बंगळुरूहून आलेल्या पर्यटकांचा हा ग्रुप दुब्बानाशाशी बीचजवळ समुद्रात उतरला होता, जिथे अचानक आलेल्या लाटांमुळे पाच जण समुद्रात वाहून गेले. घटना घडताच लाईफगार्ड्स आणि स्थानिक मच्छिमारांनी तातडीने बचाव मोहीम राबवून पाचपैकी चार पर्यटकांना पाण्याबाहेर काढलं. मात्र, त्यापैकी दोघांचा आधीच मृत्यू झाला होता, तर उर्वरित दोघांना सुखरूप वाचवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच दरम्यान लाटांसोबत बेपत्ता झालेल्या तिसऱ्या पर्यटकाचा मृतदेह नंतर शोधण्यात यश आलं.

घटना घडताच लाईफगार्ड्स आणि स्थानिक मच्छिमारांनी तातडीने बचाव मोहीम राबवून पाचपैकी चार पर्यटकांना पाण्याबाहेर काढलं. मात्र, त्यापैकी दोघांचा आधीच मृत्यू झाला होता, तर उर्वरित दोघांना सुखरूप वाचवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच दरम्यान लाटांसोबत बेपत्ता झालेल्या तिसऱ्या पर्यटकाचा मृतदेह नंतर शोधण्यात यश आलं.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं शोभा दास (वय २२, रा. झारखंड), मोहम्मद अक्रम (रा. बंगळुरू) आणि विश्व ए.के. (वय २४, रा. बंगळुरू) अशी आहेत. तर निशांत डी.व्ही. आणि मोहम्मद कासीम अशी सुखरूप वाचवण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. या पर्यटकांच्या ग्रुपमध्ये बंगळुरूतील बेलंदूर येथील एका कंपनीचे १६ कर्मचारी होते. हे सर्वजण सोमवारी संध्याकाळी गोकर्ण येथे पोहोचले होते आणि दुब्बानाशाशी बीचजवळील 'कोजे रिसॉर्ट'मध्ये मुक्कामाला होते. या घटनेची माहिती मिळताच गोकर्ण पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group