अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मोठा दिलासा देणारी बातमी समोर अली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. मात्र, यापूर्वीच सरकारी इंधन कंपन्यांनी एअरलाईन्स कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. एव्हिएशन टर्बाईन फ्युअल किंमतीमध्ये सलग चौथ्यांदा कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्परेशनने याबाबत माहिती दिली आहे.
एटीएफच्या किंमतीमध्ये 1,221 रुपये प्रति किलोलीटर एवढी मोठी कपात करण्यात आली आहे. आजपासूनच (1 फेब्रुवारी) हे दर लागू होणार आहेत.
कुठल्या शहरात किती दर?
दिल्लीमध्ये डोमेस्टिक एअरलाईन्ससाठी एटीएफमध्ये 1,221 रुपये प्रति किलोलीटर कपात केली आहे. यामुळे आता दिल्लीमध्ये एटीएफची किंमत 1,00,772.17 रुपये प्रति किलोलीटर एवढी झाली आहे. मुंबईमध्ये एटीएफचे नवे दर हे 94,246 रुपये प्रति किलोलीटर झाले आहेत. कोलकाता आणि चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे 1,09,797.33 आणि 1,04,840.19 रुपये प्रति किलोलीटर एवढे आहेत.
एखाद्या विमान कंपनीच्या ऑपरेशनल कॉस्टमध्ये जवळपास 50 टक्के भाग हा एटीएफचा असतो. त्यामुळेच इंधनाच्या किंमतीत कपात झाल्यामुळे कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सरकारने 1 जानेवारी रोजी जेट फ्यूअलच्या दरात कपात केली होती.
विमान प्रवास होणार स्वस्त?
गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने चौथ्यांदा हवाई इंधनाच्या दरात कपात केली आहे. यामुळे आता विमान कंपन्या तिकिटांच्या दरात कपात करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.