चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार्जिंगला लावलेला मोबाईल कानाला लावलात त्याचा स्फोट झाला यामध्ये 5 वर्षीय बालकाचा मृ्त्यू झालाय. ही घटना जालनाच्या भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे सोमवारी सकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ परशुराम तायडे (वय ५ वर्ष रा.आमठाणा,ता.सिल्लोड) असं मृत मुलाचे नाव आहे. मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन या ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सोमवारी (४ मार्च) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे राहणारे तायडे कुटुंबिय नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत ५ वर्षाचा चिमुकला समर्थ देखील होता.
दरम्यान, तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तायडे कुटुंब सोमवारी ४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते. त्याचवेळी नातेवाईकांच्या मुलासोबत खेळत असताना चिमुकला समर्थ याने मोबाईलची खराब झालेली बॅटरी कानाला लागली.
त्याच क्षणी भयानक स्फोट झाला. या स्फोटात समर्थच्या कानाला तसेच बोटाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समर्थला तपासून मृत घोषित केले. नातेवाईकाच्या तेराव्यासाठी आलेल्या तायडे कुटुंबियांवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.