सावधान : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; 'इतके' जण जखमी
सावधान : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; 'इतके' जण जखमी
img
Dipali Ghadwaje
 नाशिक : येथील उत्तमनगर येथे आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात मोबाईलचा स्फोट होऊन कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. त्यात एकाची तब्येत गंभीर असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या स्फोटामुळे मोठी आग भडकून घराचे नुकसान झाले. घरातील काही साहित्य जळून खाक झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, मोबाईलचा स्फोटात 3 जण जखमी झालेत. त्यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते. मोबाइल चार्जिंगला लावलेला तिथे एक परफ्युम होता या स्पोटामुळे यामुळे घराबाहेरील गाड्यांच्या देखील काचा फुटल्या, तसेच आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या. दरम्यान या घटनेमुळे परिसरात काहीशी घबराट देखील पसरली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group