Nashik Road Crime : शिष्याने मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या पैशांवर डल्ला मारणारा साधू पोलिसाच्या जाळ्यात
Nashik Road Crime : शिष्याने मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या पैशांवर डल्ला मारणारा साधू पोलिसाच्या जाळ्यात
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी): शिष्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या साधू महाराजला पोलिसांनी बुलढाणा येथून ताब्यात घेतले असून त्या चोरलेल्या पैशातून खरेदी केलेले सोने हस्तगत केले आहे.

 दि 10मार्च रोजी नाशिक रोड जेलरोड येथील शिष्य रामदास सुदात दोडके (वय 44 )यांच्या घरी त्याचे गुरु गुरुजी उर्फ गोपाल महाराज मूळ नाव मेहुल संजय डोंगरे वय 33 याने भेट दिली. 

त्यावेळी घरातुन जाताना महाराज याने शिष्य रामदास दोडके यांच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेलया सुमारे 21 लाख रुपयांवर डल्ला मारीत ती रक्कम चोरून नेली. याबाबत रामदास दोडके यांनी त्यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिसात फिर्याद दाखल केली.

या सशयित महाराजांचा समांतर तपास सुरु असतांना युनिट 2च्या पथकाने तांत्रिक विश्लेषणच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडराजा येथून गुरुजी उर्फ गोपाल महाराज मूळ नाव मेहुल संजय डोंगरे यास शीताफीने ताब्यात घेतले.

या महाराज कडून स्विफ्ट कार,नऊ तोळे सोन्याचे दागिने व एक मोबाईल असा नऊ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.पुढील कारवाई साठी युनिट 2च्या पथकाने सशयितास नाशिक रोड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्याकडून अधिक माहिती सकलित होणे बाकी आहे.

ही कामगिरी युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके,पोलीस हवालदार शंकर काळे, नंदू नंदुर्डीकर,प्रकाश भालेराव, विलास गांगुर्डे,प्रकाश महाजन, सुनील आहेर,संजय सानप, प्रकाश बोडके, सोमनाथ जाधव,तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी,रुमाले,आदिनी पार पाडली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group