धक्कादायक घटना! प्रियकराने काढला प्रेयसीचा काटा...गळा आवळून केली हत्या
धक्कादायक घटना! प्रियकराने काढला प्रेयसीचा काटा...गळा आवळून केली हत्या
img
Jayshri Rajesh
मुंबईच्या अंधेरी परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातील वादातून अंधेरीतील मरोळ येथे तरुणीची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून झैब ख्वाजा हुसैन सोलकर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला अंधेरीतील सहार पोलिसांनी अटक केली आहे. तर सारा असे या घटनेतील मृत मुलीचे नाव आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी आणि आरोपी सोलकर यांच्यात मैत्री होती. काही कारणाने मुलीने ही मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र आरोपी सोलकरला हे मान्य नव्हते. मुलीचा नकार सोलकरला मान्य नसल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतला.

झैब आणि सारा या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबध होते. मात्र अनेक गेल्या काही दिवसांपासून काही कारणांवरून दोघांमध्ये किरकोळ वाद होऊन त्यातून नेहमी खटके उडत होते. सारा ही मरोळ येथील भावाच्या घरी एकटी होती. या संधीचा फायदा घेत संशयित आरोपी झैब याने साराच्या भावाचे मरोळ येथील घर गाठले आणि त्यात पुन्हा त्यांच्यात वाद झाला. 

हा वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात झैब याने साराच्या ओढणीनेच तीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर झैब याने घटनास्थळावरून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार उशिरा लक्षात आल्याने तो पर्यंत साराचा मृत्यू झाला होता.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई करत झैब सोलकर विरोधात गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या सहार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 
आरोपी सोलकरच्या वडिलांनीच सहार पोलिसांना हत्येची माहिती दिली. यानंतर पोलीस मुलीच्या घरी दाखल झाले आणि प्रकरणाची शहानिशा केली. हत्या केल्यानंतर आरोपीने स्मशानात जाऊन स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास पोलीस  करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group