अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने सपासप वार , नेमकं काय प्रकरण?
अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने सपासप वार , नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने आपल्या आईचा गळा चिरुन तिला गंभीर जखमी केले आहे. संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा किशोर वयीन असुन हा इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. घरगुती वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्याच आईच्या गळ्यावर चाकूने वार केल्याचा गंभीर प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे.

याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे. पोलिसांनी संबंधित 14 वर्षीय मुलाला डोंगरी येथील बाल सुधार गृहात पाठवले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता घडल्याचे म्हटले जात आहे. जखमी  महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group