शाळेत विद्यार्थिनी सुरक्षित नाहीत म्हणताना आता विद्यार्थिही सुरक्षित नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे नात गुरू शिष्याचं असत म्हणतात मात्र त्या नात्यातही वाईट दुर्दैवी म्हणाव्या अशा घटना घडत आहेत.
मुंबईतील ही घटना आहे. येथील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , ही महिला मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिका आहे. मात्र, तिने या शाळेची आणि गुरु शिष्य या नात्याची काही गरीमा न बाळगता पाऊल उचलले आहे.
दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी महिला शिक्षकेला ताब्यात घेतलं आहे. गेला एक वर्षभरापासून ही शिक्षिका या विद्यार्थ्यासोबत जबरदस्त शरीरसंबंध ठेवत होती. शिक्षिकेचे वय ४० वर्षे असून, तिचं लग्न झालेलं आहे. व तिला एक मुलगा देखील आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
डिसेंबर २०२३ मध्ये शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात एका डान्स ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी या शिक्षिकेच्या संपर्कात आला होता. तेव्हाच ही शिक्षिका विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली होती. जानेवारी २०२४ मध्ये या शिक्षिकेने पहिल्यांदा या विद्यार्थ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरूवात केली.
विद्यार्थ्याने सुरूवातीला दूर राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही शिक्षिका दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क करत होती.
पुढे २०२४ च्या शेवटी विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना याबाबत कळलं. मात्र, आई-वडील मुलाचा रिझर्ल्ट लागण्यासाठी वाट बगत होते. त्यांना वाटले मुलगा १० वी पास झाल्यानंतर शिक्षिका आपल्या मुलाचा पाठलाग सोडेल. पण तस काही झालं नाही. शिक्षिका नोकराच्या माध्यमातून मुलाशी संपर्क साधत होती. त्यानंतर पालिकांनी पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी आता पोलिसांकडून या शिक्षिकेची चौकशी सुरु आहे.